सत्कर्म केल्याने भाऊसाहेब महाराजांचे नाव अमर झाले

सातारा ः गांधी मैदान येथे किर्तन सादर करताना ह.भ.प. बाबा महाराज इंगळे. समोर उपस्थित जनसमुदाय.

ह.भ.प. इंगळे महाराजांच्या किर्तनाने सातारकर न्हाले भक्‍तीरसात
सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करुन जनकल्याण साधले. मानवालाच नव्हे तर, देवालाही कर्म चुकलेले नाही. मात्र चांगले कर्म करुन छ. शिवाजी महाराज अमर झाले. त्याच पध्दतीने छत्रपती शिवरायांराचा समाजकार्याचा, जनकल्याणाचा वारसा छत्रपतींच्या घराण्यात जन्मलेल्या अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी अविरत जोपासला. थोर महात्म्यांचेच पुण्यस्मरण केले जाते. आजच्या किर्तनाला लोटलेला जनसागर पाहूनच भाऊसाहेब महाराज काय होते, हे दिसून येते. त्यांच्या महान किर्तीमुळे आजही ते आपल्यात आहेत. सत्कर्म, जनेसेवा केल्यानेच भाऊसाहेब महाराजांचे नाव अमर झाले आहे. त्यांच्या पश्‍चात त्यांचे सुपुत्र आणि असंख्य कार्यकर्ते हा वारसा पुढे चालवत असून असे उदाहरण क्‍वचितच पहावयास मिळते, असे प्रतिपादन थोर समाजप्रबोधनकार आणि समाजसुधारक विनोदाचार्य ह.भ.प. बाबा महाराज इंगळे (बीड) यांनी केले.
गांधी मैदान येथे कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने स्व. आ. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त आयोजित किर्तन, प्रवचन सोहळ्यात ह.भ.प. बाबा महाराज इंगळे बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले, श्रीमंत ओजस्विताराजे गायकवाड, श्रीमंत सत्वशिलाराजे सिंग, श्रीमंत छ. रुनालीराजे भोसले, ह.भ.प. महाराष्ट्रभूषण मदनमहराज कदम, ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांच्यासह गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर (मेढा), ह.भ.प. बबनराव सापते, ह.भ.प. श्रीपती माने, ह.भ.प. उमेश किर्दत महाराज आदी मान्यवरांसह हजारो सातारकर नागरिक आणि महिला उपस्थित होते.
ह.भ.प. बाबा महाराज इंगळे यांनी सातारकरांना किर्तनातून वास्तवाचे भान करुन दिले. आपल्या खास विनोदी शैलीत अनेक विनोदी किस्से सांगून इंगळे महाराजांनी उपस्थितांना खळखळून हसायला लावले. देव जन्माला घालताना काही देत नाही आणि परत नेतानाही काही नेवू देत नाही. जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगले कर्म केले पाहिजे तरच हे जीवन सार्थकी लागणार आहे. जीवन कसे जगावे. निर्व्यसनी, सज्जनपणे आणि सदाचाराने जीवन जगावे असे सांगून इंगेळ महाराजांनी भरकटत चाललेल्या युवा पिढीच्या वर्मावर बोट ठेवले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)