सततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-१)

ज्या ठिकाणी अतिरिक्त पाऊस होऊन पिकांमध्ये पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी काढून द्यावे.
सततच्या पावसामुळे पाणी साचल्यास व जमिनीत वापसा नसल्यास पिकांची मुळे अकार्यक्षम होतात. त्याकरीता उघडीप मिळल्यानंतर खालील उपाय योजना करावी.
1) दोन टक्के युरिया (10 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम युरिया) दोन वेळा 15 दिवसांच्या अंतराने फवारावे.
किंवा 2) 1.5 टक्के पोटॅशियम नायट्रेट (10 लिटर पाण्यामध्ये 150 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट) दोन वेळा 15 दिवसांच्या अंतराने फवारावे.
* मुग – उडीद-मुगावर रस शोषणाऱ्या किडी आणि उडीदावर केसाळ अळ्याच्या नियंत्रणासाठी 20 मिली क्विनॉलफॉस 25टक्के प्रवाही प्रति 10 लिटर पाण्यात मिसळूा फवारावे.
* सोयाबीनवाढ – खोडमाशीच्या नियंत्रणासाठी 12 मिली ट्रायझोफॉस 40टक्के प्रवाही प्रति 10 लिटर पाण्यात मिसळनूा फवारावे. उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच एकरी 8 ते 10 पक्षी थांबे शेतात लावावेत, शेत तणमुक्त ठेवावे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता 5टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. कामगंध सापळे 5 प्रति हेक्‍टरी वापरुन स्पोडोप्टेरा किडीचे निरीक्षण करावे. पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एस.एल.एन.पी.व्ही. 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच चक्री भुंगऱ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ट्रायझोफॉस 40 ई.सी. 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* कांदावाढ – पाणी साचलेल्या ठिकाणी कांद्याच्या पाती पिवळ्या पडत असल्यास उघडीप मिळल्यानंतर प्रोफेनोफॉस 15 मिली + स्टिकर किंवा टेब्युकोॅझोल 1 मिली + स्टिकर किंवा 25 ग्रॅम डायथेन एम -45 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
* भुईमुगवाढ – भुईमुगातील तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी उघडीप मिळाल्या नंतर लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* मका वाढ – सध्याच्या पावसाच्या परिस्थितीत मका पिकात ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून ड्रेचींग करावे व मर रोग टाळण्यासाठी पिकातील जास्तीचे पाणी त्वरीत काढावे.
* बाजरी वाढ – सध्याच्या पावासाच्या परिस्थितीत बाजरी पिकात ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून ड्रेचींग करावे व मर रोग टाळण्यासाठी पिकातील जास्तीचे पाणी त्वरीत काढावे. बाजरी पिक 3 आठवड्याचे असलेल्या ठिकाणी केवडा (गोसावी) रोगाचे लक्षणे दिसताच झाडे उपटून नष्ट करावीत.
सततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-२)
अमोल विलास क्षीरसागर 
चंद्रशेखर महादू गुळवे 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)