सणसवाडी दिंडीचे प्रस्थान

सणसवाडी -येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडीचे सकाळी देहूकडे प्रस्थान झाले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत सायंकाळी पंढरपूरकडे सर्व दिंड्या प्रस्थान ठेवतील. वारकऱ्यांची सणसवाडी पांडुरंग मंदिरापासून मिरवणूक काढून भैरवनाथ मंदिरात भजन आरती करून माजी उपसभापती आनंदराव हरगुडे व माजी सरपंच दता हरगुडे यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा व निरोप दिला. दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे, हभप बबनराव हरगुडे, मोहन हरगुडे, हिरामण पाटील, महादेव दरेकर व वारकऱ्यानी पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचे गजरात दिंडीने प्रस्थान केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)