सणसवाडीत वाहनाच्या धडकेत परप्रांतीय ठार

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे नगर रस्त्यावर रिक्षामधून उतरत असलेल्या सव्वीस वर्षीय युवकास पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारची जोरदार धडक बसल्याने युवकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक कारसह फरार झाला आहे.
सणसवाडी येथील दत्तकृपा हॉटेलसमोर सोमवारी रात्रीच्या सुमारास एक युवक नगर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या रिक्षामधून खाली उतरत असताना पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने आली. त्यावेळी रिक्षातून उतरत असलेल्या राधे मोहंतो या युवकास या स्विफ्टकारची जोरदार धडक बसली. त्यावेळी युवकाला गंभीर दुखापत होत युवक खाली पडला. तेव्हा शेजारील नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना या युवकाचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये राधे जोगिंदर मोहंतो (रा. एल अँड टी फाटा, सणसवाडी ता. शिरूर, मूळ रा. धरमंगा बिहार) या युवकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत निलेश संजय डाके (रा. शिक्रापूर ता. शिरूर) याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे व पोलीस नाईक तेजस रासकर हे करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)