सणसवाडीत कंटेनर चालकाला मारहाण करून लुटणारे जेरबंद

शिक्रापूर पोलिसांची 12 तासांत चमकदार कामगिरी

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका कंपनीमध्ये कंटेनरमधून मालाची ने- आण करणाऱ्या कंटेनर चालकाला मारहाण करून गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या दोघांना 12 तासांत जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले.
सचिन अंकुश गायकवाड (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) आणि निलेश रतन बुरडे (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना तळेगाव ढमढेरे आणि सणसवाडी येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. अटक केलेल्या दोघांना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत मिळालेली माहिती अशी, सणसवाडी (ता. शिरूर) येथील जॉन डियर कंपनीचे ट्रॅक्‍टर घेऊन जाणाऱ्या (एनएल 02 एल 2536) कंटेनरवरील चालक साजिद कासीम खान (रा. चोमा अलवाडा रोड, रामगड जी. अलवर, राजस्थान) हा चालक 25 सप्टेंबर रोजी सणसवाडी येथून जात असताना पाठीमागून (एमएच 12 एनएम 2635) या पल्सर दुचाकीवरील दोघांनी त्याला मारहाण करून त्याच्या खिशातील 2 हजार दोनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर, सहा गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी दिली होती. याबाबत भयभीत झालेल्या साजिद खान याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर हे करीत होते. यातील आरोपी तळेगाव, सणसवाडीजवळ फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक विजय गाले, राजेंद्र मदने यांनी सापळा रचून संशयित दोघांना अटक केली.

आरोपींकडून अजूनही गुन्हे उघडीची शक्‍यता

शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा यांसह आदी भागामध्ये नेहमीच नागरिकांना, वाहनचालकांना आणि कामगारांना लुटण्याचे प्रकार होत असून शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)