सणसवाडीतून दुचाकी चोरणारा जेरबंद

file photo

दोन दिवसांची कोठडी : शिक्रापूर पोलिसंनी दोन तासांत लावला छडा

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर)सह परिसरातील सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरेश आदी गावांमध्ये सध्या दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सणसवाडी येथून दुचाकी चोरी करून पळून जाणाऱ्या युवकास शिक्रापूर पोलिसांनी चक्क दोन तासात रंगेहात ताब्यात घेऊन अटक केली. तर आरोपीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने आणखीही दुचाक्‍या चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निलेश जयवंत पवार (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे कोठीत असलेल्याचे नाव आहे. तर चेतन गोरक्ष डाबाळे (रा. सणसवाडी ता. शिरूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबतची माहिती अशी की, चेतन यांनी दुचाकी (एमएच 09 सिएन 8666) घरासमोर लावून बाहेर गेले होते. तर परत आल्यावर त्यांना दुचाकी दिसली नाही त्यानंतर त्यांनी शोधाशोध केली मात्र दुचाकी सापडली नाही. म्हणून त्यांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यांनतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज निलंगेकर, पोलीस नाईक अनिल जगताप, योगेश नागरगोजे यांनी तातडीने सणसवाडी चौकात नाकाबंदी करत शोधाशोध सुरू केली. यावेळी चेतन डाबाळे याने दिलेल्या फिर्यादीतील चोरीच्या वर्णनाची दुचाकी घेऊन एक युवक वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्याला हटकले असता तो दुचाकी सोडून पळून जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व दुचाकीची पाहणी केली असता ती चेतन यांची दुचाकी असल्याचे आढळून आल्यानंतर निलेशला ताब्यात घेण्यात आले. तर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने चोरी करीत असल्याचे कबुल केले. त्यावेळी त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने चोरी केलेल्या काही दुचाक्‍या सणसवाडी येथील एका जंगलातील विहिरीमध्ये टाकून दिल्या असल्याचे देखील कबुल केले. पोलिसांनी सणसवाडी येथील जंगलातील एका विहिरीकडे धाव घेत त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना त्या विहिरीमध्ये देखील चोरीच्या दोन दुचाक्‍या मिळून आल्या आहेत. पुढील तपास पोलीस नाईक अमित देशमुख करीत आहेत.

  • सणसवाडी येथे अटक करण्यात आलेल्या निलेश पवार या आरोपीने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने दुचाक्‍या चोरी केलेल्या आहेत, त्याचे साथीदार सध्या फरार झालेले आहेत त्यांचा शोध आम्ही घेत असून या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे.
    – मनोज निलंगेकर, उपनिरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)