सणसवाडीतील तरूणांकडून सुधागडाची साफसफाई

सणसवाडी- सणसवाडी (ता. शिरूर) येथील अखिल सणसवाडी शिवजयंती उत्सव यांच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने “एक गाव एक शिवजयंती’ अंतर्गत पाली गणपतीजवळ असणाऱ्या सुधागड (ता. पाली, जि. रायगड) या ठिकाणी गडाची साफसफाई केली. गडाच्या परिसरातील कातकरवाडी व ठाकरवाडी येथील आदिवासींना अन्नदान व कपडे वाटप करण्यात आले. पूर गावाला अन्नदान करून तेथील शाळेला साउंड सिस्टिम भेट, विद्यार्थ्यांना कपडे, शालेय साहित्य व शिवप्रतिमा भेट देण्यात आली. या वेळी सागर दरेकर, बाळासाहेब दरेकर, नितुराज हरगुडे, जयदीप दरेकर, शुभम साठे, राहुल सोनावणे, सागर हरगुडे, सत्यवान हरगुडे, शुभम दरेकर, दत्तात्रय दरेकर ,मुख्याध्यापक माळी आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)