सणसवाडीतील गोडाऊनमधून सोळा लाखाचा माल लंपास

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे ट्रॅक्‍टर बनविणाऱ्या एल अँड टी जॉन डियर कंपनीला पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचे गोडाऊन असून, त्या गोडाऊनमधून रविवारी (दि. 29) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची घटना घडल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि फिर्यादीनुसार अविनाश कार्गो लिमिटेड कंपनीचे सणसवाडी (ता. शिरूर) येथील एल अँड टी जॉन डियर कंपनी शेजारी गोडाऊन असून, त्या ठिकाणी या कंपनीला लागणाऱ्या वस्तूंचा साठा केला जातो, रविवारी (दि. 31) रात्रीच्या सुमारास या गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत गोडाऊनमधील सुमारे सोळा लाखांच्या वस्तू चोरून नेल्या, सोमवारी (दि. 30) सकाळच्या सुमारास गोडाऊनचे शटर उचकटलेले दिसून आले, त्यामुळे त्या ठिकाणी चोरी झाल्याचे समोर आल्याने अविनाश कार्गो लिमिटेड कंपनीचे शाखा व्यवस्थापक अमोल म्हस्के यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना तेथे असलेल्या मालापैकी एल अँड टी जॉन डियर कंपनीला ट्रॅक्‍टरसाठी पुरविले जाणारे सुमारे सोळा लाख रुपये किमतीचे 78 बॉक्‍स गायब झाल्याचे दिसून आले. याबाबत अमोल काशिनाथ म्हस्के (रा. पेरणेफाटा, ता. हवेली जि. पुणे, मूळ राहणार खान्नाखोटा, ता. वडवणी, जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)