“सडक 2’मध्ये पूजा आणि आलिया दोघी भगिनी एकत्र

संजय दत्त आणि पूजा भट यांचे लीड रोल असलेल्या 90 च्या दशकातील सुपरहिट “सडक’चा रिमेक असलेल्य “सडक 2’चे शुटिंग मे महिन्यात सुरू होणार आहे. आलिया लीड रोल साकारत असेल, तर तिच्याबरोबर प्रथमच महेश भटदेखील सिनेमात काम करणार आहेत. “सडक’ प्रमाणेच “सडक 2’चे डायरेक्‍शनदेखील महेश भट करणार आहेत. आलिया आणि आदित्य रॉय कपूर हे याचे लीड ऍक्‍टर्स असणार आहेत. त्यांच्या शुटिंगला जरी मे महिन्यात सुरुवात होणार असली तरी अन्य कलाकार लगेच शुटिंग सुरू करणार नाहीत. थोड्या थोड्या कालावधीने अन्य कलाकार शुटिंग सुरू करणार आहेत.

पहिल्या “सडक’मधील हिरो संजय दत्त आणि हिरोईन पूजा भट हे देखील या रिमेकमध्ये महत्वाचे रोल साकारणार आहेत. आलिया आणि पूजा भट आपल्या घरच्या प्रॉडक्‍शनच्या सिनेमामध्ये पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. पूजा बऱ्याच वर्षांनी एखाद्या सिनेमात काम करते आहे. आलियाबरोबरचे तिचे समिकरण भन्नाट आहे. या भगिनींचे ऑन स्क्रीन बॉन्डिंग आता पहिल्यांदा बघायला मिळेल. नवीन “सडक 2′ मध्ये “सडक’मधील “तुम्हे अपना बनाने की कसम…’ हे प्रसिद्ध गाणे नवीन स्वरुपात बघायला मिळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.