सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर

करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याच्यासोबत 6 फिल्मी स्टार एकाचवेळी आले आहेत. रणबीर कपूर, आलिया भट, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, शाहरुख खान आणि आमिर खान या सगळ्यांचा एक धम्माल ग्रुप फोटो करण जोहरने शेअर केला आहे.

रणबीर आणि रणवीर दोघेही पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये एकत्र आले आहेत. याशिवाय रनबीर- आलिया आणि दीपिका हे आजी-माजी लव्हबर्डस देखील पहिल्यांदा एकत्र आलेले दिसत आहेत. ही चौकडी एकमेकांबरोबर मस्त बॉन्डिंग एन्जॉय करताना दिसते आहे. शाहरुख आणि आमिर हे सिनिअर स्टारही आपल्या ज्युनिअर फ्रेंडसबरोबर एकत्र आलेले आहेत. या सगळ्यांनी फोटोसेशनसाठी क्‍युट पोझ दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमिरच्या “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चा ट्रेलर बघण्यासाठी हे सगळेजण एकत्र आले होते. सोशल मिडीयावर या फोटोला खूप व्ह्यूज मिळायला लागले आहेत. करण जोहरने या फोटोला कॅप्शनही तशीच भन्नाट दिली आहे. एकाच फ्रेममध्ये तब्बल 6 बडे स्टार एकत्र येण्याची ही दुर्मिळ संधी असल्याने करणने या फोटोला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)