सक्रीय नेतृत्वाच्या मागे जनतेने उभे राहावे : आ. राजळे

कोरडगावात विकासकामांचे भूमिपूजन
पाथर्डी – सध्याच्या बदलत्या राजकारणात कामापेक्षा संपर्काला महत्त्व प्राप्त झालेआहे. व्यस्त कार्यक्रमामुळेकधीकधी काही ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळेकार्यकर्तेनाराज होतात. परंतु संपर्कापेक्षाही काम करणाऱ्याच्या मागे जनतेने खंबीरपणे उभे राहायला हवे, असेप्रतिपादन आमदार मोनिका राजळेयांनी केले.
कोरडगाव येथेविविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, जिल्हा परिषद माजी सदस्य सोमनाथ खेडकर, पंचायत समिती उपसभापती विष्णूपंत अकोलकर, सुनील ओहोळ, भाजपचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, खरेदी विक्री संघाचे बंडू पठाडे, वृध्देश्‍वरचे संचालक बाबासाहेब किलबिले, साहेबराव देशमुख, बाळासाहेब गोल्हार, अमोल गर्जे, कोरडगावचे सरपंच विष्णू देशमुख, उपसरपंच वसंत घुगरे, नारायण काकडे, कळसपिंप्री सेवा संस्थेचेनवनाथ भवार, आखेगावचे सरपंच बाबासाहेब गोर्डेउपस्थित होते.
आ. राजळेम्हणाल्या, कोरडगाव परिसर तालुक्‍याच्या राजकारणाचा केंद्रबिंदूआहे. तालुक्‍याच्या राजकारणाला दिशा आणि स्फूर्ती देण्याचे काम या ठिकाणावरून होते. राजळे कुटुंबातील प्रत्येक नेतृत्वाने या परिसरातूनच राजकीय वाटचालीला सुरुवात केली आहे. पाथर्डी- शेवगाव मतदारसंघामध्येरस्ते, पाणी, वीज, आरोग्य तसेच जलयुक्‍तच्या कामांना प्राधान्य दिलेजात असल्याचेही त्यांनी सांगितले .
सुकी नदीवरील बंधारा, चार लाख 71 हजारांची बंदिस्त गटार योजना , 4 लाख 84 हजार रुपयांचा हरिजन वस्ती कॉंक्रीटीकरण रस्ता अशा एकूण 26 लाख किमतीच्या कामांचेभूमिपूजन झाले. प्रास्ताविक शिवाजी हाडोळेयांनी केले. अविनाश बंड यांनी आभार मानले.

ढाकणेंच्या तालमीतलेराजळेंच्या गोटात
तालुक्‍यातील ढाकणे, राजळेया दोन घराण्यांपैकी ढाकणे कार्यकर्तेतयार करतात, पण त्यांना कार्यकर्तेसांभाळता येत नाहीत. आम्ही बाहेर पडलोतेव्हा चुकलोकी काय, असे वाटले. परंतु मागेवळून पाहिले तर आमच्या मागे राजळेंच्या गोटात यायला रांगच रांग होती. आता तर ढाकणेंच्या तालमीत तयार झालेले जवळजवळ सर्वच कार्यकर्ते राजळेंच्या गोटात सामील झालेलेआहेत, असेजिल्हा परिषद माजी सदस्य सोमनाथ खेडकर म्हणाले. यावर उपस्थितांमध्येहशा पिकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)