सकारात्मक विचारांसाठी संस्कार गरजेचे – संतोष परदेशी

शिक्रापूर- विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी त्यांच्या जीवनात यशस्वी व्यक्तींचा सहवास फार महत्त्वाचा आहे तसेच चांगल्या व्यक्तींचा दीर्घ सहवास आपणास चांगले विचार करण्यास भाग पाडतो, त्यामुळे सकारात्मक विचारांसाठी संस्कार गरजेचे असल्याचे प्रतिपादन मराठी अभ्यासक संतोष परदेशी यांनी व्यक्त केले. वरुडे (ता. शिरूर) येथील आदर्श विद्यालय येथे आयोजित संस्कार शिबिरात बोलताना मराठी अभ्यासक व्याख्याते संतोष परदेशी बोलत होते. यावेळी बोलताना परदेशी पुढे म्हणाले की, नेहमी आशावादी, आनंदी आणि उत्साही राहण्याची सवय विद्यार्थ्यांनी स्वतःला लावावी. चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रयत्नशील राहून मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करावा, तसेच स्वतःला चांगले छंद लावावेत. आई, वडील आणि गुरूंनी केलेले संस्कार आपणास आदर्श नागरिक बनवण्यासाठी मदत करतील. थोर महापुरुषांचे आत्मचरित्र वाचावे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनाची सवय विद्यार्थ्यांनी लावून रोजचा दिनक्रम देखील ठरवावा आणि खेळाचे महत्त्व लक्षात घेऊन मैदानी खेळात सहभागी व्हावे. तुमची आवड लक्षात घेऊन प्रयत्न, परिश्रम, जिद्द आणि चिकाटी या गुणांमुळे यश खेचून आणता येते यासाठी सज्ज होण्याचे आवाहन देखील यावेळी संतोष परदेशी यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. बी. चौधरी होते, तर यावेळी पंकज बांगर, ए. आर ढोबळे, बि. डी. कोळेकर, एस. यू. निकम, आर. बी. भालेराव, एस. बि. झावरे, एस. के. गायकवाड, एस. एन. भोसले, डी. एस. टकले यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)