सकल मराठा समाजाचा माळवाडीत रास्ता रोको

इंदोरी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे मावळ तालुक्‍यातील माळवाडी येथे तळेगाव-चाकण महामार्गावर ठिय्या आंदोनाद्वारे रास्ता रोको करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवार दि. 26 मावळ बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कायगाव टोका येथे एका तरुणाने पुलावरुन गोदावरीत जल समाधी घेतल्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद मावळा तालुक्‍यातही उमटायला सुरुवात झाली आहे. माळवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी मावळच्या नायब तहसीदार आणि एमआयडीसी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर माळवाडी येथे बुधवार दि. 25 ला सकाळी साडे अकराला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने भगवे झेंडे हातात धरुन घोषणा देत तळेगाव-चाकण मार्गावर रास्ता रोको केले. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे आणि मराठा मोर्चातील इतर मागण्यांचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. रास्ता रोको नंतर गावातून फेरी काढण्यात आली. मराठा आरक्षणाच्या लढ्यात काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे यांचा मृत्यू झाला. कानिफनाथ मंदिरातील सभेत त्यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाची सांगता झाली.

मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी पुकारलेल्या मावळ बंदमध्ये माळवाडी देखिली सहभागी होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. आंदोलन शांतता मार्गाने पार पडले. आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मराठा समाजाच्या प्रलंबीत मागण्यांचे वाचन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)