संस्कार स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

पिरंगुट – जेडब्ल्यूडीच्या संस्कार प्रायमरी स्कूलचे स्नेहसंमेल पुण्यात उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी, आदीवासी, देशभक्‍तीपर तसेच मातृत्त्वाची गीते यांवर आधारित गाण्यांवर नृत्याचे सादरीकरण केले. याप्रसंगी बालहक्क कार्यकर्त्या डॉ. यामिनी अडबे, आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा विजेती लौकिक पानसरे, कलाकार स्मिता सोनटक्के, मुख्याध्यापिका स्नेहा साठे, संचालक शिवाजी साठे, सभापती राधिका कोंढरे, सरपंच मंदा पवळे, राहुल पवळे, अबिकॉर बिन्झलचे संचालक उदय गोडबोले, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब करेकर, व्यावसायिक राहुल शिंदे आदी कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकार शीतल आल्हाट राठवडकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका तुळवे, शिक्षक, आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. पालक, विद्यार्थी तसेच स्थानिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.