संस्कारक्षम पीढि घडविण्याचे काम आईचे

अवसरी-महिलांकडे शारिरीक ताकद नसली तरी त्या मनाने खंबीर आहेत. आईने मुलीला मुलीसारखे वाढवा, मुलासारखे वाढवू नका. महिलांनी आपला इगो दूर ठेवा त्यामुळे घर संसार मोडत आहेत. संस्कारक्षम पिढी घडवण्याचे थोर काम आईचे आहे, असे प्रतिपादन कुटुंब व्यवस्थेवर मार्गदर्शन करताना ऍड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.
मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे माता पिता सन्मान सोहळ्या प्रसंगी अपर्णाताई रामतीर्थकर मार्गदर्शन करताना बोलत होत्या. या वेळी दत्तात्रेय महादेव मेंगडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, तुळशीराम मेंगडे, दशरथ मेंगडे, माजी सरपंच दिलीप रणपिसे, गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मेंगडे, सुयोग मेंगडे, सोनभाऊ टाव्हरे, भास्कर मेंगडे, तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामतीर्थकर म्हणाल्या, आपल्या संस्कृतीचे पालन करणे गरजेचे आहे. पुढच्या पिढीवर संस्कार झाले तरच पुढची पिढी समाजात नाव कमावेल. महिला ही घराची प्रतिष्ठा आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत घराचा उंबरा महत्त्वाचा आहे. पुरुषांनी सुद्धा बाहेरचे ताण-तणाव घरी आणू नका. तरच घरात शांतता नांदेल. सर्वच ठिकाणी कायदा वापरता येत नाही. सासूने सुनेला आणि सुनेने सासूला समजून घेतले पाहिजे. चांगली आई होणे गरजेचे आहे. मुलीच्या संसारात आईने जास्त लुडबुड करू नये. नवरा जिंकायचा असेल तर सासूला आपल्यासारखे करा. घटस्फोटाला जबाबदार सासू नसून मुलीची आई हे एकमेव कारण आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्यामुळे आजपर्यंत 14 लाख तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. एकत्र कुटुंबपद्धती ही लोप पावत चालली आहे. यावेळी हभप पुरुषोत्तममहाराज पाटील यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 189 माता-पिता यांचे त्यांच्या मुलांच्या हस्ते सामूहिक पूजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन दत्तात्रेय महादेव मेंगडे तसेच समस्त ग्रामस्थ मेंगडेवाडी ग्रामस्थ व गणेश देवस्थान ट्रस्ट यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)