संवाद युवा प्रतिष्ठानतर्फे पोलिसांना ‘घरचा डबा’

निगडी – हा संपूर्ण महिना उत्सव आणि उत्सवांच्या तयारीचा होता. या महिन्यात सुरक्षा आणि शांती व्यवस्था जपण्यासाठी पोलिंसावर तर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांवर जबरदस्त ताण होता. उत्सवकाळात रात्रंदिवस पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. हे करत असताना त्यांच्या जेवणाचेही हाल होत होते. विसर्जन मिरवणुकी दरम्यान खडा पहारा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना “घरचा डबा’ देण्याचा उपक्रम “संवाद युवा प्रतिष्ठान’च्या समन्वयकांनी पार पाडला.

या प्रसंगी चिचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे तसेच निरीक्षक शंकर अवताडे यांच्या निर्देशानुसार “भरीत-पुरी’ चे डबे व पाण्याची बाटलीचे वाटप केले. “संवाद’चे सर्व समन्वयक प्रदीप पटेल, रामचंद्र पाटील, रविंद्र कुवर, राजेंद्र निकम, माऊली जगताप, प्रल्हाद पाटील, गौतम बागुल, भगवान निकम, सचिन महाले, किरण महाजन, विशाल वाणी, प्रविण महाजन, किशोर बागुल उपस्थित होते. संवादच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी नगरसेवक नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, भाजपा व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ चिंचवडे, ब प्रभाग स्विकृत सदस्य बिभिषण चौधरी, कामगार नेते शंकर पाटील, समजसेवक विजय पाटील, रेखा भोळे, कमलाकर गोसावी, तानाजी गाडे, महेंद्र पाटील, सचिन काळभोर, मोहन भोळे, विभा, गौरी आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)