संरक्षण उत्पादकतेबाबत महत्वाचे धोरण पुढील महिन्यात 

नवी दिल्ली: संरक्षण उत्पादकतेमध्ये देशाला “मॅन्युफॅक्‍चरिंग हब’बनवण्याच्या उद्देशाने महत्वाचे धोरण पुढील महिन्यात जाहीर केले जाणार आहे. या धोरणानुसार संरक्षण उत्पादन उद्योग आणि संरक्षण साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात देशाचे स्थान आगामी 10 वर्षांमध्ये आघाडीच्या 5 देशांमध्ये असण्याचे उद्दिष्ट असेल. या धोरणाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरीला ठेवण्यापूर्वी अंतिम स्वरुप देण्यात येत आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
संरक्षण उत्पादकतेशी संबंधित या धोरणामध्ये लढाऊ विमाने, हल्ले करणारी हेलिकॉप्टर आणि शस्त्रास्त्रांसाठी आवश्‍यक असलेल्या उच्च श्रेणीचे तंत्रज्ञान उत्पादनासाठी लागणाऱ्या साधन संपत्तीसाठी पुरेशी गुंतवणूकीवर विशेष भर दिलेला असेल. हे धोरण पुढील महिन्यात जाहीर केले जाण्याची शक्‍यता आहे. लष्कररी साधने आणि सेवांसाठी 70 हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची सरकारची अपेक्षा आहे. गेल्या सहा दशकांपासून परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या या संरक्षण साहित्याची निर्मिती देशांतर्गत करण्यासाठी हे धोरण आखण्यात येत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)