संयुक्‍त राष्ट्राच्या महासभेनिमित्ताने स्वराज यांचा द्विपक्षीय संवाद

संयुक्‍त राष्ट्र – संयुक्‍त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी आज प्रमुख नेत्यांच्या विदेश मंत्र्यांशी द्विपक्षीय संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि क्षमता वृद्धीसारख्या विषयांवर त्यांनी चर्चा केली.

स्वराज यांनी मोरोक्कोचे विदेश मंत्री नस्सीर बोरिटा, युरोपिय संघासाठी विदेश व्यवहार विषयीचे उच्चस्तरिय प्रतिनिधी फेड्रिका मोघेरिनी, लिचटेनस्टेनचे विदेश मंत्री ऑरेलिया फ्रिक, नेपाळचे विदेश मंत्री प्रदीप कुमार गयावाली, स्पेनचे विदेश मंत्री जोस्प बोरेल, कोलंबियाचे विदेश मंत्री कार्लोस होम्स ट्रुजिलो, इक्‍वाडोरचे विदेश मंत्री जोस वॅलेन्सिया, ऑस्ट्रेलियाचे विदेश मंत्री मारिस प्यायन आणि मंगोलियाचे विदेश मंत्री दामदिन त्सोग्बातार यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्यच्या समान मूल्ल्यांवर आधारीत संरक्षण भागीदारीविषयक सकारात्मक चर्चा झाल्याचे या नेत्यांनी स्वराज यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर ट्‌विटमध्ये म्हटले आहे. व्यापार गुंतवणूक तसेच नवीकरणीय उर्जा, औषध उद्योग, खाण, पेट्रोलियम आणि क्षमतावृत्तीविषयी चर्चा झाल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संयुक्‍त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने स्वराज या इराक, मोल्दोवा, सायप्रस, फिजी, बैनिमारामा आणि एस्टोनियाच्या विदेश मंत्र्यांबरोबरही चर्चा करणार आहेत. याशिवाय “जी 4′ देशांच्या बैठकीमध्ये ब्राझिल, जर्मनी आणि जपानच्या नेत्यांसह त्या सहभागी होतील.

नेल्सन मंडेला शांतता परिषदेत सहभाग…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अमली पदार्थ विरोधी कार्यक्रमामध्येही स्वराज सहभागी झाल्या. यादरम्यान त्यांनी नेल्सन मंडेला शांतता परिषदेला संबोधितही केले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोन्सा, गांबियन अध्यक्ष अदमा बारो आणि सिंगापूरचे विदेश मंत्री विवियन बालाकृष्णन यांच्यासह त्यांनी वार्तालाप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)