संयुक्तराष्ट्रांच्या तिजोरीत खडखडाट

संयुक्तराष्ट्रे – संयुक्त राष्ट्रांना सध्या निधीची तीव्र चणचण भासत असून या संघटनेच्या तिजोरीत खडखडाट होत आहे. त्यामुळे सर्व सदस्य देशांनी आपला निधी त्वरीत संयुक्तराष्ट्रांकडे जमा करावा असे आवाहन या संघटनेचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की अनेक राष्ट्रांकडून त्यांची वर्गणी नियमीतपणे जमा होत नाही. त्याविषयी त्यांना पत्रेही पाठवली आहेत परंतु तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली आहे. सध्या संघटनेकडील राखीव निधीही संपत आला असून इतकी पैशाची टंचाई संयुक्तराष्ट्रांना यापुर्वी कधीच भासली नव्हती असेही त्यांनी म्हटले आहे.

भारतासह एकूण 112 देशांनी त्यांची वर्गणी भरली आहे. त्यात भारताच्या 17.91 दशलक्ष डॉलर्सच्या निधीचा समावेश आहे. जून महिन्याच्या अखेरी पर्यंत सदस्य देशांनी सन 2018 वर्षासाठी एकूण 1.49 अब्ज डॉलर्स इतका निधी जमा केला आहे. पण याच अवधीत अंदाजपत्रकानुसार एकूण खर्च 1.70 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे असे सरचिटणीसांनी म्हटले आहे. अद्याप 81 देशांनी आपला निधी दिलेला नाही. त्यात अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, ब्राझील, इजिप्त, इस्त्रायल, मालदीव, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सुदान, सीरिया इत्यादी देशांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिका हा संयुक्तराष्ट्रांचा मोठा देणगीदाता देश आहे. संयुक्तराष्ट्रांचे जे 5.3 अब्ज डॉलर्सचे बजेट असते त्यातील 22 टक्के निधी हा अमेरिकेकडून दिला जातो. शांतीसेनेसाठी जे एकूण 7.9 अब्ज डॉलर्सच बजेट असते त्यातील 28.5 टक्के निधी अमेरिकेकडून दिला जातो. अमेरिकेचे संयुक्तराष्ट्रांतील राजदूत निक्की हेले यांनी म्हटले आहे की अन्य सदस्य देशांनी आपला निधी वाढवून दिला पाहिजे.

आता अमेरिकेने एकूण बजेटच्या रकमेपैकी 25 टक्के निधीचा भार उचलण्याचे योजले आहे पण बाकीच्या राष्ट्रांनीही आता आपला निधी वाढवून दिला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)