संपूर्ण देशभरातील पर्जन्यमान अजून 5 टक्के कमीच 

संग्रहित छायाचित्र.......
नवी दिल्ली: देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात गेल्या आठवड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र संपूर्ण देशाच्या पातळीवर पर्जन्यमानाची नोंद 5 टक्के कमीच असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. या मौसमामध्ये देशभरात आतापर्यंत सुमारे 74 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण द्विपकल्प आणि मध्य भारतामध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र पूर्व आणि ईशान्य भारतात अद्याप पावसाची तूट भरून आलेली नाही. एकूण 29 टक्के नकारात्मक पर्जन्यमान झाले आहे. या भागात यंदा पाऊस चांगला झाल्याने पावसाच्या तूटीचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू काश्‍मीरमध्ये पर्जन्यमान अजूनही 1 टक्का कमी आहे.
कमी पर्जन्यमान असलेल्या झारखंडसारख्या राज्यांमध्ये गेल्या वर्षभरात चांगला पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे मध्य भारतात नेहमीच जास्त पाऊस होतो. तेथे मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तेथे यंदा पूर येण्याची शक्‍यता कमी आहे, असे “आयएमडी’चे अतिरिक्‍त महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले.
हिमालयाचा पश्‍चिम भागाला जोडून असलेल्या पठारावरचा पाऊस आता कमी होतो आहे. वायव्य उत्तर प्रदेश आणि शेजारील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच आगामी दोन दिवसात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून आर्द्रताही मिळणार नसल्याने तेथील पाऊस थोडा थांबला आहे. पूर्व उत्तर प्रदेशावर कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे पश्‍चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंड या भागांमध्ये पावसाच्या शक्‍यतेने पावसाची तूट भरून निघेल, असेही “आयएमडी’ने म्हटले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)