संदीप पाटील यांच्याप्रमाणेच कायदा सुव्यवस्था सांभाळू

पंकज देशमुख; लवकरच साताऱ्याचा कार्यभार स्विकारणार
सातारा जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेची बसवलेली घडी खुप चांगली आहे. त्यांनी कामाचा वेगळा पायंडा पुढे तसाच सांभाळू असे नवे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.

संदीप पाटील यांनी आपल्या कामातून जनतेची मनं जिंकली आहेत. अगदी तोच प्रयत्न करून सातारकरांना संदीप पाटील यांची कमी भासू दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले. देशमुख सध्या उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दंगलीच्या काही कायदेशीर बाबी पुर्ण करून वरिष्ठांचे आदेश मिळताच साताऱ्याचा कार्यभार स्विकारू असे देशमुख यांनी सांगितले.

देशमुख हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सन 2010 च्या बॅचचे टॉपर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)