संतुलित जीवनशैली हेच आरोग्याचे सूत्र : डॉ. राजश्री इंगळे-बागडे

पुसेसावळी : मोफत आरोग्य तपासणी करताना डॉ. राजश्री इंगळे व सहकारी

पुसेसावळी, दि. 27 (प्रतिनिधी) – वाढते ताणतणाव बदलती जीवनशैली, जंकफुड, आहाराच्या वेळा न पाळणे या कारणांमुळे आजार उद्‌भवण्याची शक्‍यता असते. त्यामुळे आजच्या काळात संतुलित जीवनशैली हेच आरोग्याचे सूत्र आहे, असे मत डॉ. राजश्री इंगळे-बागडे यांनी व्यक्त केले.
बॅंक ऑफ इंडियाच्या पुसेसावळी शाखेच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या. वरिष्ठ प्रबंधक किशोर बागडे, ऋण प्रबंधक आशिष भिसे, वर्मा सर, वैद्य अविनाश काशीद, भिमराव मोरे, शिवनाथ मुळे, अविनाश पाटील, सुरज पवार उपस्थित होते.
डॉ. बागडे म्हणाल्या, धावपळीच्या जीवनात चुकीच्या आहार विहार पध्दतीने आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आजाराला आपण बळी पडतो. वेळच्यावेळी आरोग्य तपासणी ही काळाची गरज आहे. गरीब गरजूंच्या आरोग्याची मोफत तपासणी होण्यासाठी अशा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करणे आवश्‍यक आहे.
शिबिरात मधुमेह, संधिवात, रक्तदाब, दमा, स्त्रीरोग आदी व्याधीवर मोफत तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले. सुमारे 110 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पुजन, मान्यवरांचे स्वागत वरिष्ठ प्रबंधक किशोर बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राजश्री इंगळे-बागडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विशाखा वाघ, डॉ. अर्चना कदम, डॉ. निशिगंधा आणेकर यांनी आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विकास जाधव, तानाजी यादव, दत्तात्रय कुंभार, शेखर सांगळे, अशोक नवगान यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक वरिष्ठ प्रबंधक किशोर बागडे यांनी केले. आभार गिरीश तळेले यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)