संतप्त विद्यार्थ्यांनी राजाळेत पुन्हा बसेस रोखल्या

फलटण : बसस्थानकात ठिकठिकाणी साचलेली चिखलाची डबकी. (छाया : अजय माळवे)

गावात एसटी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

गोखळी, दि. 28 (वार्ताहर) – फलटण तालुक्‍याच्या पूर्व भागातून येणारे एस.टी.थांबत नसल्यामुळे मंगळवारी संतप्त विद्यार्थ्यांनी राजाळे येथे पुन्हा एकदा एस.टी.बसेस रोखल्या.
पूर्व भागातून आसू, शिंदेनगर, गुणवरे, मुंजवडी आदी भागातून येणारी एसटी बसेस राजाळे येथे थांबत नसल्यामुळे फलटण येथे महाविद्यालयात जाणारे विद्यार्थ्यांचे पहिले दोन तास बुडतात म्हणून गेल्या आठवड्यात दि. 20 रोजी एस. टी. बसेस रोखल्या. परंतु, ग्रामस्थांनी मध्यस्थी करून एस.टी. अधिकाऱ्यांना सांगून बसेस करण्यासाठी विनंती करू, राजाळेपर्यंत सकाळी साडेसहा वाजता बसेस सुरू करण्यास विनंती करू, असे सांगितल्याने विद्यार्थ्यांनी बसेस सोडल्या होत्या. परंतु, आठवडा झाला तरी राजाळेपर्यंत बस सुरू न केल्यामुळे मंगळवार, दि. 28 रोजी सकाळी साडेसहा वाजता पूर्व भागातून येणाऱ्या बसेस रोखल्या. यामुळे बसने पूर्वभागातून येणाऱ्या सर्वच विद्यार्थी अडकून पडले. ही घटना समजताच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरक्षक कदम, घटनास्थळी जावून आम्ही आजच एस. टी. आगारप्रमुखांच्या बरोबर मिटींग लावून प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन विद्यार्थी व पालकांना दिले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अडवलेल्या एस.टी. बसेस लगेच सोडल्या. एस.टी. बसेस रोखल्यामुळे एक तास फलटणकडे जाणारी व येणाऱ्या आठ एस.टी.बसेस अडकून पडल्यामुळे वाहतूक खोळंबून पडली होती. यामुळे बाहेर गावाकडे जाणारे प्रवाशी व विद्यार्थ्यी खोळंबून पडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)