संतपीठाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने : आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका

पिंपरी – चिखली येथील संतपीठाच्या कामामध्ये रिंग होऊन झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन सदर ठेकेदाराचे काम रद्द करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. तसेच, भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण करुन त्या ठिकाणी व्यवसायिकरण करण्याचा डाव आमदार महेश लांडगे यांचा असल्याचा आरोप साने यांनी पत्रकार परिषदेत केला.

साने म्हणाले की, महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेदरम्यान कार्यपत्रिकेवरील प्रत्येक विषयाचे वाचन न करता महापौरांनी एक ते बारा विषय मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. सभेतील विषय सभापटलावर न ठेवता अचानक मंजूर करणे घटनाबाह्य आहे. हे विषय मंजूर केले तरी त्यांची अंमलबजावणी करण्यात येऊ नये. याचबरोबर, सत्ताधारी पक्षाने महापालिकेचे व्यवसायिकरण केले आहे. संतपीठाच्या कामातील ठेकेदारांच्या संभाषणावरुन रिंग केल्याचे सिध्द होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावी. याचबरोबर, सत्ताधारी आमदारांनी भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण करुन त्या ठिकाणी व्यवसायिकरण करण्याचा ठेका घेतल्याचा, आरोप साने यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)