संचारबंदी शिलॉंगमध्ये शिथिल

शिलॉंग : मेघालयची राजधानी असणाऱ्या शिलॉंगमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंसदी सकाळी दहा वाजता 12 तासांसाठी शिथिल करण्यता आली. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्री नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे येथे राजकीय हिंसाचार उफाळल्यानंतर येथे संचारबंदी जारी करण्यात आली होती. या भागात लच्कराच्या 20 कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत.

सदर आणि लुंडायनगिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आल्याचे पूर्व खासी पर्वतीय जिल्ह्याचे उपायुक्त एम. एन. नॉनब्री यांनी सांगितले. गुरूवारनंतर संचारबंदी असतानानाही अनुचित घटना घडल्या होत्या. त्यामुळे अजून येथे इंटरनेट सेवा खंडित ठेवण्यात आली आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ मेघालयाच्या राजधानीत जोरदार हिंसाचार उफाळला होता. अनेक इमारती आणि वाहने उद्‌ध्वस्त करण्यात आली होती. त्यामुळे तेथे लष्कर तैनात करण्यात आले होते. आसाममध्येही काल संचारबंदी झूगारत लाखो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिसांच्या वाहने पेटवून दिली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण मरण पावले होते. भाजपा आणि आसाम गण परिषदेच्याकार्यलयावर हल्ले चढवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.