संघ, शिक्षक बॅंक कार्यकर्त्यांच्या विचाराची राहील : पुस्तके

कोळकी, दि. 27 (वार्ताहर) – शिक्षक संघाला खच्ची करण्याचे काम गेली तीन चार महिने सुरू आहे. मात्र, शिक्षक संघाचे कोणी वाकडे करू शकणार नाही. संघ व शिक्षक बॅंक ही कार्यकर्त्यांच्या विचाराचीच राहील, सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून संघ मजबूत करूया, अशी अपेक्षा राज्याचे संपर्क प्रमुख सिध्देश्वर पुस्तके यांनी व्यक्त केली.
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नुकताच गुंफण पुरस्कार मिळाल्याबद्दल सिध्देश्वर पुस्तके, नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र घोरपडे व उपाध्यक्ष महेंद्र अवघडे यांचा सत्कार राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र लावंड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

राजेंद्र घोरपडे म्हणाले, नेत्यांवर केलेले कोणतेही आरोप खपवून घेतले जाणार नाही. त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. संघात दोन गट पाडण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. अशा स्थितीत कार्यकर्त्यांनी संघ एकसंध राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष रामचंद्र लावंड यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष महेंद्र अवघडे, मोहन निकम, सुरेश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे, संचालक अनिल शिंदे, केंद्रप्रमुख मोहिते, मलगुंडे यांनी मनोगते व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, मच्छिंद्र मुळीक, विक्रम डोंगरे, सुनील खंडाईत, सुजीत जाधव, शिवाजी जाधव, गोरख साळुंखे, रुपेश जाधव, शंकर जांभळे, राजकुमार जाधव, दत्तात्रय कोरडे,बंडोबा शिंदे, गणेश तोडकर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रविण घाडगे, अंकुश शिंदे, प्रवीण गोसावी, बजरंग वाघ, शहाजी जाधव, दत्तात्रय ढेकळे, विक्रम दिवटे, रघुनाथ कुंभार, सतिश निंबाळकर, संदीप निकम यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सुभाष ढालपे यांनी प्रास्ताविक केले. इम्तियाज तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी कदम यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)