संग्रही असू द्या…

शरीर आहे, तिथे व्याधी आहे. कोणत्याही ऋतूत किरकोळ आजार हे होत असतातच. कुठलेही काम करताना, चालताना, खेळताना, स्वयंपाक करताना, प्रवास करताना, लग्नप्रसंगी, शाळेत, रस्त्यात, देवळात, घरात अशा अनेक प्रसंगी कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव आपल्या शरीरास किंवा इतर व्यक्‍तींच्या शरीरास दुखापत होत असते. यासाठी प्रत्येकाला काही औषधे माहीत असणे हे अत्यंत आवश्‍यक आहेच. प्रवासात किंवा घरी ही प्रथमोपचाराची पेटी संग्रही असू द्या. 

हळद– कोठेही खरचटले, कापले असता हळद दडपावी. सर्दी झाल्यास विस्तवावर हळद टाकून रात्री त्याची धुरी घ्यावी. चेहरा नितळ होण्यासाठी साय व हळद तोंडाला लावावी. घसा खवखवत असल्यास कपभर दुधात एक चमचा हळद घालून गरमागरम दूध रात्री प्यावे. मार बसून सूज आल्यास हळद व तेल लावून शेकावे. पायाच्या बोटास चिखल्या झाल्यास रात्री हळद व गोडेतेल लावावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोहरी– कोणतेही लोणचे घालण्यासाठी मोहरीची पूड लागतेच. थंडीच्या दिवसांत अंग फुटते, त्यावेळी रात्री अंगाला मोहरीचे तेल लावावे. थंडीने पोटात मुरडा होत असेल तर चमचाभर मोहरी व थोडी मेथी गरम पाण्याबरोबर गिळून टाकावी.

मेथी– दररोज फोडणीत मेथीची पूड टाकावी, त्यामुळे पोटात वात धरत नाही. मधुमेह झालेल्यांनी दररोज रात्री मेथी एक चमचा पाण्यात भिजत घालावी. सकाळी चावून खावी.
मेथीला मोड आणून उसळ करावी. मेथी वातहारी आहे. आव पडत असल्यास मेथी चमचाभर गरम पाण्यातून घ्यावी. मेथीची पालेभाजी खावी.

हिंग– दररोज फोडणीत हिंग घालावा. पदार्थ रुचकर होतो. थंडीने पोटात दुखत असेल तेव्हा बेंबीत हिंगपूड व थेंबभर पाणी घालून तासभर झोपावे. पोटात मुरडा होत असेल तर चमचाभर हिंग व सुपारीएवढा गूळ
मिसळून सकाळी खावा. अपचन झाल्यास ताकात चिंचोक्‍याएवढा हिंग घालून वाटीभर प्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)