संगमनेर येथील यात्रा आनंदोत्सवात साजरी

जोगवडी- येथील “काळुबाईच्या नावान चांगभल…’ जल्लोशात भाटघर धरणाच्या शेजारी वसलेल्या संगमनेर गावची यात्रा आनंदात साजरी झाली. यात्रेनिमित्त ढोल लेझीम, लोकनाट्य, तमाशा, कुस्त्यांचा फड, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम झाले. कुस्त्यांच्या फडामध्ये मुलींनीही सहभाग घेतल्याने हा विषय कुतुहलाचा ठरला.
दरवर्षी प्रमाणे अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी संगमनेर येथे यात्रा उत्सहात पार पडली. यात्रेच्या अगोदर हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम झाला असून काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी सुभाष कड यांच्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यात्रेच्या दिवसी गुरुवारी (दि. 19) पहाटे 5 वाजता. देवाच्या मूर्तीला स्नान घालून अभिषेक करण्यात आला. साय. 4 ते 7 या वेळेत श्री. काळभैरवनाथ देवाची पालखीची मिरवणूक झाली. यावेळेत गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत ढोल लेझमीच्या खेळासाठी गावाच्या बाजूच्या परिसरातील खेळगडींनी हजेरी लावल्या. शुक्रवारी (ता. 20) सकाळी 11 ते 4 या वेळेत लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. साय. 4 ते 7 या वेळेत कुस्त्यांचा फड झाला. यात महिलांनी हजेरी लावली. यात सिध्दी कोंडे (शिवापूर), पुनम चोरघे (कोंढणपूर), ऋतिका मानकर (मानकरवाडी), आर्या खोपडे (आंबाडे), मयुरी साळुंके (गवडी) या मुलींनी सहभाग घेतल्याने हा विषय कुतुहलाचा झाला. या कार्यक्रमास गावातील आणि परिसरातील लोकांची गर्दी झाली होती, अशी माहिती यात्रा कमिटीतील विनायक धुमाळ यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)