संगमनेर मर्चंटस् बँक ही सहकारातील आदर्श आर्थिक संस्था – सुभाष देशमुख

संगमनेर -अर्धशतकाची गौरवशाली परंपरा असलेली संगमनेर मर्चंट्स बँक म्हणजे सहकार क्षेत्रातील एक आदर्श आर्थिक संस्था आहे असे गौरवोद्गार राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी येथे काढले.

याच वेळी जीएसटी हा अगदी छोट्या सेवा शुल्कावर व्यापारी वर्गाला जाचक वाटू नये यासाठी तो कमी व्हावा आणि व्यापारी वर्गाला सुसह्य व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासनही  त्यांनी दिले.काल विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने देशमुख संगमनेर दौर्‍यावर आले होते.त्यावेळी त्यांनी संगमनेर मर्चंटस् बँकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासह आमदार बाळासाहेब थोरात व बँकेचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी उपस्थित होते.

यावेळी बँकेचे चेअरमन श्रीगोपाल पडतानी यांनी भाषणातून तसेच निवेदनाद्वारे काही महत्त्वपूर्ण मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या त्यास उत्तर देताना देशमुख यांनी वरील आश्वासन दिले. संगमनेर मधील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने जे जे करणे शक्य आहे ते जरूर केले जाईल असेही देशमुख यावेळी म्हणाले.संगमनेर मर्चंटस् बँकेने 52 वर्षात केलेल्या प्रगतीविषयी त्यांनी भाषणात गौरवोद्गार काढले.

ही बँक म्हणजे एक आदर्श संस्था असल्याने अन्य आर्थिक संस्थांना येथे खूप काही शिकण्यासारखे आहे. संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी दाखविलेल्या मार्गावर आजचे संचालक मंडळ पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभार करीत असल्यानेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चालला असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)