संगमनेर, अकोले तालुक्‍यातील 35 तलाठ्यांच्या बदल्या

संगमनेर – संगमनेर उपविभागीय कार्यालयांतर्गत संगमनेर, अकोले तालुक्‍यातील 112 तलाठ्यांपैकी 35 तलाठ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांनी काढले. मात्र, या बदल्यांमुळे तलाठ्यांमध्ये “कहीं खुशी,कहीं गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर, अकोले तालुक्‍यातील अनेक सजांमध्ये पाच-सहा वर्षांपासून काम पाहत असलेल्या तलाठ्यांच्या शासकीय नियमाप्रमाणे बदल्या होणे अपेक्षित होते. त्यातील अधिक कार्यकाळ झालेल्यांसह कार्यकाळ पूर्ण न झालेल्या तलाठ्यांच्याही बदल्या झाल्याचे दिसून आले. मध्यंतरीच्या काळात ऑनलाइन सात-बाराच्या कामामुळे रखडलेल्या बदल्यांचे आदेश सोमवारी काढण्यात आले. बदली झालेल्या तलाठ्यांचे नाव, सध्याचे ठिकाण आणि कंसात बदली झालेले ठिकाण – बा. की. दातखिळे, धामणगाव आवारी, (अकोले), स. बा. मांढरे, पळसुंदे (पिंपळगाव नाकविंदा), भा. पा. चौधरी, भळेवाडी (भंडारदरा), श्रीमती ज्यो. प. पालवे, कातळपूर (बेलापूर), र. द. डगळे, भंडारदरा (कातळापूर), ब. भा. बगड, विठे (पिंपरकणे), ज्ञा. र. बांबळे, पिंपळगाव नाकविंदा (राजूर), उ. वी. देवघडे, सातेवाडी (अकोले), श्रीमती सु. श. बांबळे, कोहणे (सातेवाडी), सु. ज. नागरे, गणोरे (कनोली), श्रीमती सो. मा. वलवे, पिंपरकणे (वठे), रो. स. गायकवाड, पडोशी (सुगाव बुद्रूक), श्रीमती म. रा. ढगे, सुगाव बुद्रूक (हिवरगाव), श्रीमती प्री. वि. वर्पे, हिवरगाव पावसा (जवळे कडलग), श्रीमती वै. अं. मोरे, आश्वी खुर्द (खळी), बा. भा. नरवडे, वरुडी पठार (तळेगाव), श्रीमती यो. भो. शिंदे, राजापूर (संगमनेर खुर्द), पो. द. तोरणे, संगमनेर खुर्द (संगमनेर बुद्रूक), श्रीमती व. द. सातपुते, जवळे कडलग (वडगाव पान), अ. रा. आव्हाड, कनोली (शेडगाव), रा. पां. ताजणे, साकूर (वरुडी पठार), अ. सु. आंबरे, पिंपरकणे (तिरढे), श्रीमती अ. सु. नाळे, निमगाव (मालदाड), श्रीमती. र. रा. बानाईत, धांदरफळ बुद्रूक (सुकेवाडी), श्रीमती शि. दि. दिघे, देवगाव (डोळासणे), श्रीमती अ. रो. साठे, मालदाड (निमगाव बुद्रूक), श्रीमती मं. र. डोंगरे, सुकेवाडी (धांदरफळ बुद्रूक), प्र. शां. हासे, वडगाव पान (पिंपरणे), सो. मा कटारे, चणेगाव (हिवरगाव पठार), बी. एस. वैद्य, रहिमपूर (साकूर), ए. एस. कुंदेका, निमोण (पळसुंदे), बी. एस. काकड, बोटा (घुलेवाडी), आर. एम. हिवरे, घुलेवाडी (बोटा), श्रीमती मंगल सांगळे खळी (चणेगाव), डी. बी. भालचिम, संगमनेर बुद्रूक (आश्वी खुर्द) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात 14 महिला तलाठी आहेत. मात्र, या बदल्यांमुळे तलाठ्यांमध्ये “कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण निर्माण झाले असून, काही तलाठ्यांच्या कार्यकाळ संपण्यापूर्वीच बदल्या झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)