संकष्टी चतुर्थी कीर्तन महोत्सवाचे आयोजन

निगडी – श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे चैत्र वद्य चतुर्थी ते फाल्गुन वद्य चतुर्थी अर्थात एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत संकष्टी चतुर्थी कीर्तने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यमुनानगर, निगडी येथील श्री अष्टविनायक मंदिरामध्ये सायंकाळी सहा वाजता ही कीर्तने होणार आहेत. या महोत्सवांतर्गत हभप शैलेजा जतकर, सुहासबुवा देशपांडे, अंजली कछहाडकर, ज्ञानेश्वर कपलाने, वैशाली घैसास, ओंकारबुवा कपलाने, प्राजक्ता वझे, रामचंद्रबुवा भिडे, प्रेमा कुलकर्णी, शरदबुवा गोडसे, स्मिता देशपांडे, दीपकबुवा रास्ते, अविनाश परांजपे, मानसी जोशी यांची दर महिन्याला कीर्तने होणार आहेत.

या सर्व कीर्तनकारांना हेरंब चिंचणीकर हे संवादिनी साथवर साथ करतील. तर रघुवीर केंच तबला साथ देणार आहेत. शहरातील कीर्तनप्रेमींनी कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)