“श्री समर्थ’मध्ये शिवजयंती उत्साहात

चिंबळी- चिंबळीफाटा येथील श्री समर्थ इंग्लिश मीडिया स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे, प्राचार्य विष्णू भद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर स्कूल व कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करीत छत्रपतींचा इतिहास भाषणातून उलगडला. दरम्यान, शिवव्याख्याते प्रमिला पडवळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्य अनिता टिळेकर, शोभा तांबे, मोनाली मुंगसे, स्मिता नलगे, मीनाक्षी पाटील, रत्नाकर वाघमारे, सुरज सोमवंशी, नवनाथ मेदनकर यांच्यासह कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.