श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने प्रसन्नता लाभली

अभिनेते अंकुश चौधरी ः चित्रीकरणादरम्यान ग्रामदैवताच्या मंदिरास भेट
नगर – महाराष्ट्रात ठिकठिकाणी चित्रीकरणासाठी फिरतांना अनेक धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग येत असतो. आपली श्रद्धा आणखी दृढ होत जाते.श्री विशाल गणेशाची दर्शन घेऊन धन्य झालो आहे. येथील श्री गणेशाची भव्य अशी मूर्ती मनाला प्रसन्न करते. मंदिरातील नक्षीकाम, स्वच्छता व पावित्र्य उत्तम असून या ठिकाणी आल्यावर प्रसन्नता लाभली े. या मंदिराची प्रचिती नगरला आल्यावर ऐकून होतो, चित्रीकरणासाठी या ठिकाणी आलो तेव्हा त्याची प्रचिती आली. यापुढेही आपण या श्री विशाल गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येवू, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अंकुश चौधरी यांनी केले. चित्रपट अभिनेते अंकुश चौधरी चित्रीकरणासाठी नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात आले असता दर्शन घेतले. याप्रसंगी देवस्थानचे सचिव अशोक कानडे यांनी मंदिराची माहिती दिली व देवस्थानाच्यावतीने यथोचित सत्कार केला. याप्रसंगी विश्‍वस्त ज्ञानेश्‍वर रासकर, हरिश्‍चंद्र गिरमे आदि उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)