श्री भैरवनाथ महाराज उत्सव समितीला मान्यता

आळंदी- श्री भैरवनाथ महाराज उत्सव समिची पंचवार्षिक कार्यकारिणीला पुणे धर्मादाय आयुक्‍तांनी मान्यता दिली. समितीच्या अध्यक्षपदी शंकर कुऱ्हाडे पाटील यांच्यासह 17 सदस्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तसेच 2018-2019 ते 2022-23 या कार्यकाळासाठी बदल प्रस्तावास देखील मान्यता दिली आहे. मार्च महिन्यात आळंदीत श्री भैरवनाथ महाराज यांचा वार्षिक उत्सव होत आहे. त्यासाठी आळंदीत तयारीला वेग आला असल्याचे अध्यक्ष कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले. उत्सव समिती पुढीलप्रमाणे; अध्यक्ष : शंकर कुऱ्हाडे पाटील, उपाध्यक्ष : सुभाष पाचुंदे, सचिव : रमेश कारले, खजिनदार : सुरेश दौंडकर, कार्याध्यक्ष : नितीन घुंडरे, उपसचिव : कैलास वहिले, सदस्य : नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, ज्ञानेश्‍वर घुंडरे, सोमनाथ वाघमारे, विवेक रणदिवे, सुजित वाघमारे, महेश गोरे, अतुल लोणकर, कामगारनेते अरुण घुंडरे पाटील, आरिफ शेख, बाळासाहेब मा. कुऱ्हाडे पाटील यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.