“श्रीसमर्थ’च्या शाखांचे पुरस्कार वितरण उत्साहात

चिंबळी- चिंबळी फाटा येथील श्रीसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलेजच्या पाच शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. यावेळी सर्वोत्तम समर्पण पुरस्कार खराबवाडी येथील स्कूलच्या लेखापाल राणी पाटील, उतृष्ट शिक्षक प्रीती मेमाणे, मयुरी बिरदवडे, नवनाथ कोळेकर, उत्कृष्ट पालक संतोष गायकवाड, उर्मिला गायकवाड, उत्कृष्ट विद्यार्थी सानवी हिरमुखे, पुर्वी तिकडे, हर्षदा पाटील, तुषार किलबिले यांना स्कूल व कॉलजचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्‍त राज्यस्तरीय ऍबॅकस स्पर्धेत रौप्य पदक विजेती श्रावणी पाटील, हर्षदा पाटील, मार्गदर्शक शिक्षिका स्मिता जाधाव तसेच चिंबळी फाटा येथील प्राचार्य अनिता टिळेकर, खराबवाडीच्या प्राचार्य विद्या पवार, खालुंब्रेच्या प्राचार्य कोमल फलके, काळूसच्या प्राचार्य सपना टाकळकर, केळगांवच्या प्राचार्य ललिता बडदे, श्रीसमर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे, पत्रकार सुनील बटवाल आदिंचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौवर करण्यात आला. याप्रसंगी निखील कांबळे, विकास पिवळे, संतोष गवारे, समीर गवारे, प्रशांत थोरवे, अर्जुन जाधव, अजित थोरात यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.