श्रीलंकेच्या सलामीवीराची बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून चौकशी

क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूचं निलंबन
कोलंबो – श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज धनुष्का गुणतिलकाची, लंकन पोलिसांकडून बलात्कार प्रकरणात चौकशी करण्यात आलेली आहे. कोलंबो येथील एका हॉटेलवर नॉर्वेची रहिवासी असलेल्या एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. या घटनेत गुणतिलकाचा मित्र संदीप जुद सेलिहा हा आरोपी असल्याचं समजंतय. या प्रसंगादरम्यान धनुष्का गुणतिलका हॉटेलमध्ये उपस्थित असल्यामुळे श्रीलंकन पोलिसांनी त्याची चौकशी केल्याचं समजतंय. या घटनेनंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने गुणतिलकेचं निलंबन केलं आहे.

गुणतिलका आणि त्याच्या मित्राने नॉर्वेच्या दोन महिलांना आपण वास्तव्यास असलेल्या रुम्समध्ये आणले होते. त्यानंतर काही वेळाने त्या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप गुणतिलकाच्या मित्रावर केला आहे. पोलिसांनी गुणतिलकाच्या मित्राला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, गुणतिलकावर यावेळी कुठलाही आरोप करण्यात आलेला नाही. पण हे वाईट कृत्य होत असताना तो त्याच रुममध्ये होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली नसली तरी मंडळाने बडगा उगारला आहे. गैरवर्तुणक केल्याप्रकरणी गुणतिलकावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील मानधनही दंड स्वरुपात कापण्यात येणार असल्याचे श्रीलंकेच्या मंडळाने स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत गुणतिलकाने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. ही घटना घडली तेव्हा मी हॉटेलमध्ये झोपलेलो होतो, आणि आपला मित्र व पीडित महिलेमध्ये नेमकं काय घडलं हे मला माहिती नाही असं गुणतिलकाने पोलिसांना सांगितलं आहे. संदीप सेलिहा हा श्रीलंकन वंशांचा ब्रिटीश नागरिक आहे. या घटनेनंतर पीडित महिलांनी कोलंबो पोलिसांकडे याबद्दल तक्रार दाखल केली असून, संदीपला अटक करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)