श्रीलंकेचा विजय

लाहोर: श्रीलंका संघाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना देखील जिंकला व पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. काल झालेल्या तिसऱ्या सामन्यांत त्यांनी पाकिस्तानला 13 धावांनी पराभूत केले.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 147 धावा केल्या. अशोडा फर्नांडोने 48 चेंडूत 78 धावांची खेळी केली, त्यात 8 चौकार व 3 षटकारांचा समावेश आहे. पाकिस्तानने सुरुवात चांगली केली होती.

केवळ 1 गडी गमावून त्यांनी निम्म्या षटकांत 63 धावा केल्या होत्या. हॅरीस सोहेलने अर्धशतकी खेळी केली. मात्र, अव्वल फलंदाज बाबर आझम 27 धावांवर बाद झाल्या.

श्रीलंकेने त्यांचा डाव 6 बाद 134 धावांवर रोखला व विजयासह मालिकाही जिंकली. लेगस्पिनर विनिंदू हसरंगाने 21 धावांत 3 गडी बाद करत पाकिस्तानवर वर्चस्व राखले. हसरंगाला सामन्याचा तसेच मालिकेचा मानकरी घोषित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.