श्रीलंका संघात फेरबदलाची नांदी ‘या’ खेळाडूची झाली हकालपट्टी

मॅथ्यूजची हकालपट्टी, चंडीमलची नियुक्‍ती 
कोलंबो: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून अँजेलो मॅथ्यूजची हकालपट्टी करण्यात आली असून त्याच्या जागी कसोटी संघाचा कर्णधार दिनेश चंडीमलची नियुक्‍ती करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट नियामक मंडळाने आज हा निर्णय जाहीर करताना संघात आणखी फेरबदल करण्याचे संकेत दिले. तसेच आगामी इंग्लंड दौऱ्यातूनही मॅथ्यूजला वगळण्यात आले आहे. 
नवोदित अफगाणिस्तान संघाने अनपेक्षित कामगिरी बजावताना श्रीलंका आणि बांगला देश या कसलेल्या संघांना पराभूत करीत खळबळ उडवून दिली. या विजयामुळे अफगाणिस्तानची जागतिक क्रिकेटमधील प्रतिष्ठा उंचावली, तशीच पराभूत झालेल्या श्रीलंका व बांगला देशची पत खालावली. श्रीलंकेला तर सलग दोन पराभव पत्करावे लागल्यामुळे स्पर्धेतील त्यांचे आव्हान गटसाखळीतच संपुष्टात आले. या पराभवाचा परिणाम मॅथ्यूजच्या हकालपट्टीत झाला. 
मॅथ्यूजला सुमारे 10 महिन्यांपूर्वी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्‍त करण्यात आले होते. त्याची कामगिरी गेल्या काही दिवसांत सहा पराभव व दोन विजय अशी खालावतच चालली होती. मॅथ्यूजच्या अगोदर केवळ 8 महिन्यांच्या कालावधीत उपुल थरंगा, लसिथ मलिंगा, चमारा कपुगेदरा आणि थिसारा परेरा यांनीही श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्याउलट कसोटी कर्णधार म्हणून चंडीमलची गेल्या दोन वर्षांची कारकीर्द बऱ्यापैकी सुस्थिर आहे. आता विश्‍वचषक स्पर्धा जेमतेम नऊ महिन्यांवर आली असताना श्रीलंकेसमोर, तसेच चंडीमलसमोरही एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाचा पेच सोडविण्याचे आव्हान आहे. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)