पिंपरी – मावळात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. ते 35903 मतांनी आघाडीवर आहेत.
श्रीरंग बारणे यांना 1 लाख 26 हजार 582, पार्थ पवार यांना 90 हजार 679, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 10 हजार 74 मते मिळाली आहेत. 2 हजार 977 मते नोटाला मिळाली आहेत.
श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा आपले नशिब आजमावत आहेत. तर बारणे यांच्या विजयामुळे शिवसेनेला मावळात विजयी हॅटट्रीक साधता येणार आहे. पार्थ पवार यांच्यामुळे पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.