श्रीनाथ एज्युकेशनमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात

परिंचे- श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ एज्युकेशनमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मैदानी खेळाबरोबर धनुर्विद्या, स्केटिंग, गन शुटिंग आदी स्पर्धेतील स्पर्धकांनी पालकांसह उपस्थितांची मने जिंकली. क्रीडा महोत्सवामध्ये थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, कबड्डी, खो-खो, रनिंग आदी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या सभागृहात गायन, वकृत्व व मराठी, हिंदी, इंग्रजी कवितांच्या वाचनाबरोबरच वर्षभरातील विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या प्रशिक्षण भिसे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यालयातील अनेक विद्यार्थी धनुर्विद्येत प्रशिक्षण घेत असून राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली असल्याचे मुख्याध्यापिका वृषाली धुमाळ यांनी सांगितले. यावेळी सभापती अर्चना जाधव, परिंचे गावचे सरपंच समीर जाधव, सरपंच माऊली वचकल, वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे संस्थापक नितीन धुमाळ यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.