श्रीदेवीची धाकटी मुलगीही बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज

“धडक’मधून श्रीदेवीची मुलगी जान्हवीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आता जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत तिची लहान बहिण खूशीलाही अभिनेत्री बनण्याचा ध्यास लागला आहे. सुरुवातीला खूशीला मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करायचे होते. पण तिने आपला मोर्चा आता अभिनेत्री होण्याकडे वळवला आहे.

“धडक’च्या प्रमोशन दरम्यान जान्हवीसोबत नेहमी खूशी असायची. बऱ्याचदा ती ग्लॅमरस पार्ट्यामधून वावरतदेखील असते. आपल्या मित्र मैत्रीणींसह खूशी बऱ्याचदा एन्जॉय करताना दिसली आहे. ती हौशी फोटोग्राफर्सची आवडती व्यक्ती आहे. गेल्यावर्षी ती एका डान्स शोमध्ये भाग घेणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. पण श्रीदेवीने त्यावेळी या अफवा असल्याचे सांगितले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जान्हवी आणि खूशी या श्रीदेवीपासूनच्या दोन मुली बोनी कपूर यांना आहेत. तर त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांच्यापासून अर्जुन कपूर आणि अंशुला ही दोन अशी चार अपत्ये आहेत.

बोनी यांनी आपण आपल्या मुलांच्या संगोपनात कोणतीही ढवळाढवळ केले नसल्याचे सांगितले. ‘मी जान्हवीला मोटीव्हेट केले नाही. जे तिला करायचे आहे तिच्या त्या निर्णयावर मी तिच्या पाठीशी ठाम राहिलो. तर खूशीला सुरुवातीला मॉडेल व्हायची इच्छा होती. पण तिने आपला फोकस अभिनेत्री होण्याकडे शिफ्ट केला आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)