श्रीजेश व राणी रामपाल यांच्याकडे वर्षभरासाठी नेतृत्व

  राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 55 संभाव्य खेळाडूंची घोषणा

बंगळुरू – भारतीय पुरुष व महिला हॉकी संघांच्या कर्णधारपदी अनुक्रमे पी. आर. श्रीजेश आणि राणी रामपाल यांची निवड करण्यात आली आहे. या वर्षअखेरपर्यंत ही नेमणूक आहे. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारताचे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते.

दरम्यान राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग याच्यासह 55 संभाव्य खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या शिबिरात भारताच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागी संघातील खेळाडूंचाही समावेश आहे. त्याचबरोबर आघाडीच्या फळीतील रमणदीप सिंग, बचावफळीतील सुरेंदर कुमार, वीरेन्द्र लाक्रा, दिपसान तिर्की आणि नीलम संजीप झेस या वरिष्ठ खेळाडूंचा देखील संभाव्य खेळाडूंमध्ये सहभाग आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय गटाच्या स्पर्धेत अ व ब गटातून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील या संघात सहभाग आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेतील निकाल आम्हाला अनपेक्षित असा होता, तरीही त्या स्पर्धेतील अनुभव आम्हाला पुढील स्पर्धांमध्ये उपयुक्‍त ठरेल. त्याच बरोबर आमचा प्रशिक्षण देणारा कर्मचारी वर्गाचा आमच्या खेळण्याच्या पद्धतीवर विश्‍वास असला, तरी आम्हाला आमच्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे, असे भारताचे प्रशिक्षक जारेड मारिज्ने यावेळी म्हणाले. शिबिरात विकास दहिया, जर्मनप्रीत सिंग आणि गुर्जिंदर सिंग या पेट्रोलियम स्पोर्ट प्रमोशन बोर्डच्या खेळाडूंचा सहभाग असून रेल्वे स्पोर्टस प्रमोशन बोर्डचे अमित गोवडा व प्रदीप सिंग हे देखील सहभागी होणार आहेत.

आनंद लाक्रा या सेनादल क्रीडा मंडळाच्या खेळाडूचा देखील संभाव्य संघात समावेश आहे. त्याच बरोबर राजकुमार पाल, मोहमद राहिल, मनिंदरजीत सिंग, व्ही. वीरतामिझान, सोमजीत, अमोन मिश्रा, आभारन सुदेव, अजय यादव, धर्मिंदर सिंग या वरिष्ठ गटाच्या अ विभागातील खेळाडूंचा, तसेच ब गटातून प्रदीप मोर, सुखजीत सिंग, गगनदीप सिंग (वरिष्ठ), गोलरक्षक जगनदीप दयाल, सुमित कुमार, परवीन मिंझ, अभिलाष स्टॅलिन, कार्तिक यादव, हरीश मुतागर या खेळाडूंचा शिबिरात सहभाग आहे.

सहभागी खेळाडूंची यादी

गोलरक्षक – पी.आर. श्रीजेश, सूरज करकेरा, क्रिशन बी. पाठक, विकास दहिया व जगदीप दयाल.

बचावफळी – रूपिंदर पाल सिंग, हरमनप्रीत सिंग, सुरिंदर सिंग, कोठाजीत सिंग, वरुण कुमार, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, वीरेंद्र लक्रा, दिपसान तिर्की, नीलम संजीप झेस, जरमनप्रीत सिंग, गुरजिंदर सिंग, अमित गौडा, प्रदीप मोर आणि आनंद लाक्रा

मध्य रक्षक –  मनप्रीत सिंग, चिंगलेनसाना सिंग, विवेक सागर प्रसाद, सुमित, सिमरनजीत सिंग, नीलकांता शर्मा, ललित उपाध्याय, सरदार सिंग, हार्दिक सिंग, मनप्रीत (ज्युनिअर), सोमजीत, राजकुमार पाल, अमोन मिराश तिर्की, धरमिंदर तिर्की आणि व्ही. वीरतामिझान.

आघाडी फळी – आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, गुरजंत सिंग, रमणदीप सिंग, एस. व्ही. सुनील, दिलप्रीत सिंग, सुमित कुमार, मोहमद उमर, आभारन सुदेव, मोहमद राहील, परीप सिंग, अजय यादव, अरमान कुरेशी, सुखजीत सिंग, गगनदीप सिंग (सिनिअर), हरीश मुतागर, अभिलाष स्टालिन सी, कार्तिक यादव, प्रवकार मिंझ आणि मनिंदरजीत सिंग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)