शौर्य, सेवापदक प्राप्त सैनिकांच्या अनुदानात वाढ 

राज्य सरकारचा निर्णय 

मुंबई – देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या तसेच प्रसंगी प्राणांचेही बलिदान देणाऱ्या सैन्य दलातील शौर्यपदक व सेवापदक प्राप्त सैनिकांना तसेच मरणोत्तर शौर्यपदक मिळवणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार परमवीर चक्र, अशोक चक्रधारकांना 30 लाखांऐवजी 60 लाख रूपये एकरकमी रोख अनुदान देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रातील अधिवासी असणाऱ्या सैन्यदलातील शौर्यपदक व सेवापदक धारकांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या रोख अनुदान तसेच मासिक अनुदानात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये परमवीर चक्र, अशोकचक्रधारकांना 30 लाखांऐवजी 60 लाख रूपये, सर्वोत्तम युद्ध सेवा पदक, महावीरचक्र, किर्ती चक्र धारकांना 18 ऐवजी 36 लाख, उत्तमतम युद्ध सेवा पदक, वीरचक्र, शौर्यचक्र, युद्ध सेवा पदकधारकांना 12 ऐवजी 24 लाख रूपये, सेना-नौसेना-वायुसेना पदकधारकांना 6 ऐवजी 12 लाख रूपये, तर मेन्शन इन डिस्पॅच पदकासाठी 3 लाखाऐवजी 6 लाख रूपये एकरकमी अनुदान देण्यात येणार आहे.

परमविशिष्ट सेवा पदकासाठी 2.04 लाखांऐवजी 4 लाख, अतिविशिष्ट सेवापदक 1.03 लाख ऐवजी 2 लाख, सेना नौसेना वायुसेनापदकासाठी दीड लाख, विशिष्ट सेवा पदक 40 हजारऐवजी 1 लाख, मेन्शन इन डिस्पॅचपदकासाठी 50 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.

मासिक अनुदानातही वाढ

पदकधारक तसेच शहिदांच्या विधवा पत्नी वा अवलंबितांना मासिक अनुदानही देण्यात येते. परमवीरचक्र धारकांना 16,500 ऐवजी 33 हजार, अशोक चक्रधारकांना 13 हजार 200 ऐवजी 26 हजार 500, सर्वोत्तम युद्ध सेवा पदकासाठी 12 हजार 540 ऐवजी 25 हजार, महावीरचक्र 12 हजार 540 ऐवजी 25 हजार, किर्ती चक्र 9 हजार 900 ऐवजी 20 हजार, उत्तम युद्ध सेवापदक 8 हजार 580 ऐवजी 17 हजार,वीरचक्र 7 हजार 260 ऐवजी 14 हजार 500, शौर्य चक्र 4 हजार 620 ऐवजी 9 हजार, युद्ध सेवा पदक 3 हजार 960 ऐवजी 8 हजार, सेना नौसेना वायूसेना पदकासाठी 2 हजार 640 ऐवजी 5 हजार 500, मेन्शन इन डिस्पॅच 1 हजार 320 ऐवजी 2 हजार 500, व्हिक्‍टोरिया क्रॉससाठी 13 हजार 200 ऐवजी 26 हजार 500 इतके मासिक अनुदान देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)