शॉक लागून प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

धुळे – प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून विजेच्या खांबावरच मृत्यू झाल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला. ही दुर्घटना साक्री तालुक्‍यातील सुरपाणा शिवारात घडली. पाचोरा तालुक्‍यातील सुरेश बंजारा हा 23 वर्षीय युवक साक्री वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून कार्यरत होता.

उच्चदाब वाहिनीवरील दुरुस्तीचे काम करताना वीज प्रवाह अचानक सुरु झाल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. उच्चदाब वाहिनी असलेल्या विजेच्या खांबावर प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याला चढू देऊ नये, असा वीज वितरण कंपनीचा नियम आहे. मात्र या नियमाचे घटनास्थळी उल्लंघन झाल्याचे दिसून येते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)