शैफलर कंपनीचा चमकदार ताळेबंद 

मुंबई: औद्योगिक व ऑटोमोटिव्ह पुरवठादार कंपनी शैफलर इंडियाच्या संचालक मंडळाने दुसऱ्या तिमाहीसाठी आणि पहिल्या सहामासाठीच्या आर्थिक निकालांना मंजुरी दिली आहे. एप्रिल ते जून च्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 14.55 टक्‍क्‍यांनी वाढून 543.7 कोटी रुपये झाले. गेल्या तिमाहीत नफा 12.9 टक्‍क्‍यांनी वाढून 9445 दशलक्ष रुपयांपर्यंत गेला. 30 जून रोजी संपलेल्या साहामित उत्पन्न 10,878 दशलक्ष रुपयांपर्यंत वाढले. जे 2017 वर्षांच्या संबंधित कालावधीपेक्षा 14.3 टक्‍के अधिक आहे. शैफलर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, पायाभूत सुविधा, रेल्वे, बांधकाम उपकरणे, व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्‍टर यांसारख्या क्षेत्रांतील चांगल्या मागणीमुळे आम्ही या तिमाहीत उत्तम कामगिरी करू शकलो.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)