शेवगाव शहरासह तालुक्‍यात अहल्यादेवी होळकर जयंती साजरी

शेवगाव – राजमाता अहल्यादेवी होळकर यांची 293 वी जयंती शेवगाव शहरासह तालुक्‍यात ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. आंबेडकर चौकामध्ये होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक सागर फडके, माजी सभापती ऍड. अविनाश मगरे, धनगर समाज संघटनेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र कोरडे, नवनाथ सुडके यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी मान्यवरांनी, “कर्तव्यनिष्ठ, धाडसी, न्याय, नीती, धुरंधर व उत्तम जलनियोजक व समाजातील सती प्रथेसारख्या अनिष्ठ रुढी मोडून काढणाऱ्या कर्तृत्ववान राज्यकर्त्या म्हणून अहल्यादेवी होळकर या परिचित होत्या,’ अशा शब्दांत भावना व्यक्‍त केल्या. या वेळी कानिफनाथ कर्डिले, महेश मिसाळ, अशोक गवते, राहुल कर्डिले, गणेश क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यासह शहरातील मिरी रोड, धनगरगल्ली, कोरडेवस्ती, कोल्हेवस्ती आदी ठिकाणी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. त्यामध्ये जय मल्हार तरुण मंडळ, राजमाता अहल्यादेवी तरुण मंडळ, धनगर समाज संघटना आदींनी परिश्रम घेतले.
तालुक्‍यातील सामनगाव येथे अहल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कापरे, अमोल नजन, मल्हारी नजन, ज्ञानेश्‍वर नजन, सतीश म्हस्के, गणेश नजन, श्रीराम नजन, धनू म्हस्के, नंदू नजन, सर्जेराव सातपुते, संजय खरड, भारत नजन, नामदेव काळे, नीलेश झाडे, मयूर म्हस्के आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)