शेवगाव तालुक्‍यात बारावीचा निकाल 90 टक्के

सहा विद्यालयांचे 100 टक्के यश
विज्ञान शाखेचा रोहन म्हस्के तालुक्‍यात प्रथम
 रेसिडेन्सिअल विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

शेवगाव  – तालुक्‍याचा बारावी परीक्षेचा निकाल 90 टक्के लागला. रेसिडेन्सिअल हायस्कूल, ठकूबाई घाडगे विद्यालय, बाळासाहेब भारदे विद्यालय, चापडगाव विद्यालय, बोधेगाव येथील शिवाजी विद्यालय व गायकवाड जळगाव येथील आदर्श विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आर्टस्‌, कॉमर्स ऍन्ड सायन्स कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. या कॉलेजचा रोहन म्हस्के विज्ञान शाखेत 88 टक्के गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम आला.
निकाल पुढीलप्रमाणेः रेसिडेन्सिअल विद्यालय – प्रथम क्रमांक- पूजा सुरेश शिंदे – 88 टक्के, द्वितीय – ऐश्‍वर्या बाबासाहेब महाजन – 87.53 टक्के, तिसरा क्रमांक – शेख असीम मुर्तजा – 87.23 टक्के. संस्था समितीचे सल्लागार बापूसाहेब भोसले, प्राचार्य दिलीप फलके यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आबासाहेब काकडे विद्यालयाचा कला शाखेचा निकाल 95 टक्के, तर विज्ञान शाखेचा निकाल 99 टक्के लागला. कला शाखा : प्रथम- वर्षा भाऊसाहेब शिंदे – 83 टक्के, द्वितीय – प्रज्ञा भागवत झिरपे- 82 टक्के, तिसरा क्रमांक – शुभांगी दिगंबर वीर – 82 टक्के. विज्ञान शाखा : प्रथम क्रमांक – भार्गवी सुनील काकडे व शीतल सयाराम सुडके – 84.77 टक्के. बाळासाहेब भारदे हायस्कूल, वाणिज्य शाखा : प्रथम क्रमांक – अक्षय राम पिसोटे – 83 टक्के, दुसरा क्रमांक – प्रतीक्षा ओमप्रकाश सारडा – 82 टक्के, तिसरा क्रमांक – विजया अंधारे- 78 टक्के. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आर्टस्‌, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या विज्ञान शाखेत रोहन म्हस्के याने 88 टक्के गुणांनी प्रथम क्रमांक मिळवला. दुसरा क्रमांक – अंजली म्हस्के – 84 टक्के, तिसरा क्रमांक – अमित पातकळ – 82 टक्के.

मुलीच अव्वल…
तालुक्‍यात बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. आबासाहेब काकडे विद्यालयातील दोन्ही शाखेत पहिले तीनही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. रेसिडेन्सिअल विद्यालयात पहिले दोन क्रमांक मुलींनीच मिळवले. न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात विज्ञान व वाणिज्य शाखेत मुलीच अव्वल ठरल्या. बाळासाहेब भारदे विद्यालय व प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कॉलेजमध्ये मुलींनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)