शेवगावमध्ये घेतली पन्नास हजार विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीची शपथ

जिल्ह्यातील पहिलाच वेगळा उपक्रम
शेवगाव – माझ्या घरातील… गल्लीतील.. वार्डमधील..कॉलनीतील… व गावातील एक ही, अठरा वर्षाचा… नवमतदार नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही… अशा आशयाची मतदार जागृतीची शपथ तालुक्‍यातील सर्व पहिली ते बारावीच्या सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांनी आज सकाळी साडे आठ वाजता एकाच वेळी घेऊन एक विक्रम केला आहे.
याबाबत माहिती अशी कि,शेवगावचे तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार माधव गायकवाड, गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेऊन मतदार जागृतीची हि कल्पना देण्यात आली होती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी राऊळ यांनी तालुक्‍यातील सर्व शाळांना पत्र देऊन याबाबत सूचना दिल्या होत्या. मतदार जागृतीची शपथ शेवगावचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गणपत दसपुते यांनी तयार केली होती.
शेवगावमध्ये सर्व 225 प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी मतदार जागृतीची शपथ घेऊन एक विक्रम केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक जानेवारी 2019 ला अठरा वर्ष पूर्ण असणारा एक हि नवमतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, असे मत शेवगावचे तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी व्यक्‍त केले.
सध्या 1 सप्टेंबर ते 21 ऑक्‍टोंबर या दोन महिन्याच्या कालवधीत विशेष मतदार नोंदणी मोहीम सुरु असून तिचा एक भाग म्हणून निवडणूक शाखा व शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे. तालुक्‍यात मतदार नोंदणीसाठी 195 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यासाठी नेमले असून ते आपल्या बूथ वर नवमतदाराची नोदणी करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)