शेळी व्यापाऱ्याला पावणेदोन लाखांना लुटले

कोपरगाव – मुंबई- नागपूर महामार्ग रस्त्यावरील संवत्सर शिवारातील रेल्वे उड्डाणपुलावर आयशर टेम्पोला मोटारसायकल आडवी घालून सात-आठ जणांच्या पैकी चार जणांनी गाडीच्या केबीनमध्ये घुसून कोयत्याचा धाक दाखवून गाडीतील सर्वांना पावणेदोन लाखांना लुटले. कोपरगाव पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे. कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल होताच फिर्यादीला रेकार्डवरील गुन्हेगारांचे फोटो दाखविताच त्यातील दोघांना फिर्यादीने ओळखले. आणखी काही तरुणांचा शोध पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गादर्शनाखाली पोलिसांचे पथक घेत आहे.
बुलडाणा जिल्हयातील व्यापारी 25 जुलै रोजी पहाटे 4.45 वाजेच्या सुमारास देवनार (मुंबई)येथून विकत घेतलेल्या शेळ्या जालना येथे नेत होते. कय्युम कुरेशी यांच्या मालकीच्या आयशर गाडी (नंबर एम.एच. 04 एचवाय 6949) शेळ्या भरून ड्रायव्हर प्रल्हाद नारायण वाघ व क्‍लिनर राजू शंकर आडे (रा. नानशी ता. मंठा जि. जालना) व सोबत कामगार शेख जुबेर शेख उस्मान, युसुफभाई राजू (पूर्ण नाव माहित नाही) असे सर्वजण मुंबईहून जालना येथे जात होते. 25 जुलै रोजी पहाटे 4.45 वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्ग रस्त्यावरील संवत्सर शिवारातील रेल्वे उड्डाणपुलावर आयशर टेम्पोला मोटारसायकल आडवी घातल्याने चालकाने आयशर थांबविला. तीन दुचाकीदेखील मागे येऊन उभ्या राहिल्या. त्यावरून आलेल्या सात-आठ लुटारूपैकी दोन जणांच्या हातात कोयता व लोंखडी गज होता. त्यातील दोघांनी जबरदस्तीने आयशरच्या केबीनचे दरवाजे उघडले. पॅन्टच्या खिशातील दोड लाख रुपये बळजबरीने काढून घेतले. ड्रायव्हरच्या खिशातून सहा हजार रुपये काढून घेतले. मोबाईल असे सुमारे एक लाख 78 हजारांचा मुद्देमाल काढून घेतला.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत शेख इरफान शेख अहमद यांनी दिलेल्या फिर्याद दिली. फिर्यादीला रेकार्डवरील गुन्हेगारांचे फोटो दाखविले असता त्यातील धनंजय प्रकाश काळे व योगेश कैलास खरात यांना त्यांनी ओळखल्याने त्या दोघांसह इतर सहा अनोळखी इसमांविरोधात भारतीय दंडविधान कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)