शेतमाल प्रक्रिया संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

मंचर- आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थेने शेतकरी हितासाठी विविध उपक्रम राबवुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. संस्थेच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शेतमाल खरेदी विक्री करावे, असे आवाहन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऍड. बाळासाहेब बाणखेले यांनी केले. मंचर (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्‍वर गेणभाऊ गावडे याच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक उत्तम थोरात, बाळासाहेब घुले, शांताराम हिंगे, रामभाऊ ढोबळे, शरद बॅंकेचे संचालक बाळासाहेब बाणखेले, बाजार समितीचे संचालक गणपत इंदोरे आदी उपस्थित होते. गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने मंचर येथे शेतकरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्यामुळे संस्थेस नफा मिळालेला आहे. सध्या संस्था पेप्सीको इंडिया होल्डिंग कंपनीबरोबर सातगाव पठार येथे बटाटा पिकांची करार शेती करते व कृषिसेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर खते खरेदी विक्री करते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भगवान सिनलकर आणि व्यवस्थापिका पारु लोहार यांनी दिली. प्रमोद वळसे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष मनोहर सोमवंशी यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)